बारामती शहरातील होणार्या वाहतूक कोंडीमुळे जनता हैराण
कारवाई व दंडात्मक कारवाईचा बडगा उगारूनही नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र

बारामती शहरातील होणार्या वाहतूक कोंडीमुळे जनता हैराण
कारवाई व दंडात्मक कारवाईचा बडगा उगारूनही नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र
बारामती वार्तापत्र
शहरातील दैनंदिन वाहतूक कोंडीने बारामतीकर हैराण झाले असून, याबाबत प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी बारामतीकरांची मागणी आहे. अनेक ठिकाणी मनमानी पद्धतीने चारचाकी व दुचाकींचे केले जाणारे पार्किंग, अनेक ठिकाणी झालेले अतिक्रमण, रस्त्यांची काही ठिकाणी झालेली दुरवस्था, वाहतूक नियंत्रक दिव्यांचा अभाव, वाहनतळासाठी नसलेली जागा यांचा एकत्रित परिणाम म्हणून वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
वाहतूक पोलिस काही चौकात काही वेळा हजर असतात, तर काही वेळा काही कारणांनी ते हजर नसतात. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आता बारामतीत फक्त वाहतूक पोलिसांची नाही, तर वाहतूक नियंत्रक दिव्यांची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहतूक नियंत्रक दिवे लावण्याबाबत सूचनाही दिलेल्या होत्या, मात्र अधिकाऱ्यांनी पुढे नेमके काय केले? याची माहिती गुलदस्त्यातच आहे.
कारवाई व दंडात्मक कारवाईचा बडगा उगारूनही नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील वर्दळीच्या चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्याची गरज आहे, मागणी नागरिक करीत आहेत.