स्थानिक

काळ्या काचांवर पोलीस स्टिकर लावून मिरवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई कधी..?

बारामतीत वाहतूक पोलिसांची दुटप्पी कारवाई

काळ्या काचांवर पोलीस स्टिकर लावून मिरवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई कधी..?

बारामतीत वाहतूक पोलिसांची दुटप्पी कारवाई

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरात सध्या बेशिस्त वाहन चालकांना अटकाव घालण्यासाठी पोलीस यंत्रणेच्या वाहतूक शाखेकडून कारवाईचे सत्र सुरू आहे.

विशेषतः शहरात येणाऱ्या काळ्या फिल्मींग केलेल्या काचेच्या गाड्या अडवून काळे फिल्मींग काढून टाकण्यात येत आहे तसेच चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

मात्र, अशा पद्धतीची कारवाई करताना पोलिसांकडून दुजाभाव केला जात असल्याची चर्चा सध्या बारामतीकरांमध्ये आहे. शहरात सर्वसामान्य लोकांवर कारवाई होत असताना वाहनांवर पोलीस स्टिकर लावलेल्या आणि काळ्या काचा केलेल्या अनेक गाड्या बारामती शहरातून घिरट्या मारत आहेत.

बारामती शहरातल्या मुख्य चौकातून अशा अनेक गाड्या ये जा करीत असताना वाहतूक पोलीस मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. विशेष म्हणजे पुढच्या बाजूला पोलीस असे लिहिलेले स्टिकर लावून या गाड्या शहरात दिमाखाने मिरवत असतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांची कारवाई केवळ सामान्य नागरिकांसाठी आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय.

Back to top button