स्थानिक

अजितदादांच्या जनता दरबारात दिलेल्या कामात दिरंगाई; गुणवडी रोड, विश्वास नगर येथील नागरिक संतप्त

तब्बल २५० ते ३०० फ्लॅट आहेत

अजितदादांच्या जनता दरबारात दिलेल्या कामात दिरंगाई; गुणवडी रोड, विश्वास नगर येथील नागरिक संतप्त

तब्बल २५० ते ३०० फ्लॅट आहेत.

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील गुणवडी रोड, विश्वास नगर परिसरातील नागरिक गेल्या पंधरा वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सुमारे २,५०० ते ३,००० लोकसंख्येच्या या सोसायटीत आजवर ना रस्त्याची सुविधा आहे ना अन्य नगरपरिषदेकडून मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

या समस्येमुळे त्रस्त नागरिकांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने रस्ता करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, काही महिने उलटल्यानंतरही काम सुरू झाले नाही.

पुन्हा एकदा नागरिकांनी अजितदादांची भेट घेऊन सूचना अमलात आणल्या जात नसल्याची तक्रार केली. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी फोनवरून संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रस्त्याचे काम सुरू झाले, पण केवळ खडी टाकून काम अर्धवट ठेवण्यात आले आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. संतप्त नागरिकांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली असून, “नको तो असा विकास” अशा शब्दांत रोष व्यक्त केला आहे.

 

Back to top button