स्थानिक

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य; टेस्टिंग ट्रॅकची दय

अजितदादांची प्रतिमा स्वच्छताप्रिय नेत्याची, मात्र...

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य; टेस्टिंग ट्रॅकची दयनीय अवस्था, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

अजितदादांची प्रतिमा स्वच्छताप्रिय नेत्याची, मात्र…

बारामती वार्तापत्र 

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) परिसरात सध्या अस्वच्छतेचे आणि निष्काळजीपणाचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे या कार्यालयाचा टेस्टिंग ट्रॅक सध्या गवताने व्यापलेला असून, नागरिकांना वाहन चाचणी दरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रशासकीय दुर्लक्षामुळे संपूर्ण परिसरात जागोजागी गवत वाढले असून, प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा आणि धुळीचा साचलेला थर यामुळे कार्यालयाची प्रतिमा मलीन झाली आहे. वाहन तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांना या अस्वच्छतेमुळे त्रास होत आहे. काही ठिकाणी गवत इतकं वाढलं आहे की टेस्टिंग ट्रॅक ओळखूही येत नाही.

अजितदादांची प्रतिमा स्वच्छताप्रिय नेत्याची, मात्र…

उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वच्छतेच्या बाबतीत अत्यंत कडक भूमिका घेतात. त्यांनी बारामतीला आदर्श शहर बनवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. मात्र त्यांच्याच बारामतीत प्रशासनातील काही अधिकारी त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत, असे चित्र सध्या RTO कार्यालयात पाहायला मिळत आहे.

अधिकारी कामचुकार की नियोजनशून्य?
या कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी साफसफाई बाबत गंभीर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे नागरीकांमध्ये नाराजी आहे.

नागरिकांची मागणी – तात्काळ कारवाई व्हावी
परिसर स्वच्छ ठेवणे ही प्राथमिक जबाबदारी असतानाही कार्यालय प्रशासन हात झटकून मोकळं झालं आहे. नागरिकांनी या कार्यालयात स्वच्छता राखावी आणि टेस्टिंग ट्रॅकची नियमित देखभाल व्हावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Back to top button