जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी घेतली गडकरी यांची भेट
नागरी सुविधा, रस्ते व महामार्ग या विषयांवर सविस्तर चर्चा..

जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी घेतली गडकरी यांची भेट
नागरी सुविधा, रस्ते व महामार्ग या विषयांवर सविस्तर चर्चा..
इंदापूर, आदित्य बोराटे –
देशाचे केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे, नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी भेट घेतली.
या संदर्भात अधिक माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट मी घेतली आहे. या भेटीदरम्यान विविध विकासकामांबाबत, पायाभूत सुविधांमधील सुधारणा, नागरी सुविधा, रस्ते व महामार्ग यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी केलेले कार्य, त्यांच्या योजनांची अंमलबजावणी आणि कार्यपद्धती नेहमीच प्रेरणादायक वाटते.
माझे व नितीन गडकरी यांचा जुना स्नेहबंध आहे. त्यांचे मला मार्गदर्शन लाभणे ही नेहमीच एक प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी गारटकर यांनी व्यक्त केला. अनुभूती असते. त्यांच्याकडून मिळणारे विचार आणि धोरणात्मक दिशा ही आगामी काळात समाजोपयोगी कामासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. असाही विश्वास जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केला.