विद्यापीठस्तरीय महोत्सवात इंदापुरातील विद्यार्थ्यांचे वर्चस्व
विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात सहभाग

विद्यापीठस्तरीय महोत्सवात इंदापुरातील विद्यार्थ्यांचे वर्चस्व
विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात सहभाग
इंदापूर,आदित्य बोराटे –
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्वानों कल्याण मंडळ यांच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन विद्यापीठस्तरीय जल्लोष युवा महोत्सवात इंदापुरातील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने यश प्राप्त केते. या स्पधेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
अहिल्यानगर येथील दादासाहेब पाटील महाविद्यालय कर्जत येथे सांस्कृतिक युवक महोत्सव पार पडला. या महोत्सवात इंदापूरच्या विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात सहभाग घेतला, यामध्ये वादविवाद स्पर्धेत अक्षय यादव आणि सायली मखरे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवीत सुवर्णपदक, ओकार कदम या विद्यार्थ्याने तालवाद्य या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावित रौप्यपदक, भारतीय वैयक्तिक गायन स्पर्धेत सरदार मुलाणी या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले.
दरम्यान, यावेळी प्राचार्य डॉ.जीवन सरवदे, कला विभाग प्रमुख डॉ. भरत भुजबळ, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सदाशिव उंबरड यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील विभागीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. तानाजी कसबे व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे, प्रा. प्रकाश करे, सचिन आरडे यांनी मार्गदर्शन केले.