
स्त्रीशक्तीची भरारी आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वाचे: सौ. विशाखा दलाल
‘घे भरारी’
बारामती वार्तापत्र
“स्त्री म्हणजे जीवनाची दिशा, संस्कारांची शिदोरी आणि समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली.
आपल्या मनोवृत्तीची उडान अशीच उंचच उंच उडवूया व स्त्रीशक्तीची भरारी आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन प्रेरणादायी व्यख्यात्या विशाखा दलाल यांनी ‘घे भरारी’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमात उपस्थित महिलांना संबोधित केले.
मंगळवार दि.१६ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) बारामती वैष्णवी समिती आणि बारामती मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
मराठा सेवा संघाच्या विषवस्त जयश्री सातव, छाया कदम, मा. नगरसेविका डॉ. सुहासिनी सातव,जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण व इतर मान्यवर उपस्तीत होते.
डॉ.अपर्णा काटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. दीपाली शिंदे आणि सौ. संजीवनी गिरमकर यांनी ‘घे भरारी’ या नाटिकेचे सादरीकरण झाले.
पुराणातील सप्तमाता संकल्पनेवर प्रकाश टाकत सांगितले की, स्त्रीची भरारी ही केवळ स्वप्नपूर्तीपुरती मर्यादित नसून ती शिक्षणाच्या पंखांनी सजलेली, आत्मविश्वासाच्या आकाशात झेपावणारी, सबलीकरणाच्या सूर्यकिरणांनी उजळलेली आणि प्रेम, स्नेह, लज्जा, शक्ती, भक्ती व त्याग यांची ओळख असलेली असते.
राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण–महाभारताची शिकवण देऊन घडविले, तसेच भारतीय संस्कृतीत स्त्री ही सन्मान, सामर्थ्य आणि संस्कारांचा अभिमान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले असल्याचे विशाखा दलाल यांनी सांगितले.
सौ. उषा गावकर यांनी आभार मानले. प्रा. नीलिमा पेंढारकर यांनी सूत्रसंचालन केले.