बारामतीत सकल हिंदु समाजाकडून मारुती मंदिर स्थलांतराला विरोध.. ह. भ. प. संग्राम भंडारी यांनी बारामतीत उपस्थित राहत दिला हा इशारा
महाआरतीला भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

बारामतीत सकल हिंदु समाजाकडून मारुती मंदिर स्थलांतराला विरोध.. ह. भ. प. संग्राम भंडारी यांनी बारामतीत उपस्थित राहत दिला हा इशारा
महाआरतीला भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
बारामती वार्तापत्र
बारामतीत सकल हिंदू समाजाच्या वतीने मारुती रायाची झाली महाआरती..
बारामती शहरातील एका मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणात येणारे मारुती मंदिर हलविण्याचा प्रस्ताव समोर आला असून याला सकल हिंदू समाजाने जोरदार विरोध दर्शवला आहे.
या निर्णयाविरोधात काल सकल हिंदू समाजाच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या महाआरतीला शहरातील अनेक भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. संग्राम भंडारी यांनी स्वतः उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला.
यावेळी बोलताना म्हणाले बारामती शहरातील ग्रामदैवत असलेले मारुतीचे मंदिर हटवण्यात येणार असल्याची माहिती आहे याबाबतची नोटीस देखील मंदिर व्यवस्थापकांना मिळाल्याची माहिती आहे यामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत..
याबाबत संग्राम भंडारी महाराज यांनी बारामतीतील इंदूरचे मंदिरे विकासाच्या नावाखाली पाडू नका अन्यथा मरू किंवा ठोकण्याचा नारा देत एक प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशाराच दिला आहे..