इंदापूर
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बैलपोळा साजरा…
बळीराजाच्या सुखासाठी आणि पिकांना चांगला भाव मिळावा.. अशी प्रार्थना...

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बैलपोळा साजरा…
बळीराजाच्या सुखासाठी आणि पिकांना चांगला भाव मिळावा.. अशी प्रार्थना…
इंदापूर;प्रतिनिधि
भाद्रपद महिन्यात साजरा होणारा बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांचा उत्सव, त्यांचा बैलांबद्दलचा स्नेह आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. यावर्षी, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बैलाला रंग लावत उत्साहात बैलपोळा साजरा केला.
बैलपोळा हा शेतकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो. बैल वर्षभर शेतीत काम करतो आणि शेतकऱ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असतो. भाद्रपदी बैलपोळा निमित्ताने आज घरोघरी बैलाची पूजा आणि उत्सव साजरा होत आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, परमेश्वराला एवढेच साकडे, की येणाऱ्या वर्षी शेतकऱ्यांना सुख, समृद्धी आणि त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळो; माझा बळीराजा सुखी व्हावा…