नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणार मोफत जेवण.
इंदापूरात मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ पुणे यांच्या वतीने इंदापूर शहरातील १०० नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लॉकडाउन आणि कोरोनाच्या संसर्गजन्य विषाणूची तीव्रता कमी झाल्या नंतर तब्बल एक वर्ष मोफत मध्यान्ह भोजन योजना शहरात सुरू केली जाणार असल्याचे मत आयोजक रमेश शिंदे यांनी सांगितले.
या योजनेची प्राथमिक स्वरूपात सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली आहे.
यावेळी पुण्याचे कामगार नेते जयंत शिंदे,इंदापूर नगरपरिषदेचे विरोधीपक्ष नेते पोपट शिंदे,राष्ट्र सेवा दलाचे पुणे जिल्हा संघटक गफूर सय्यद,महात्मा फुले सत्यशोधक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय शिंदे व उपाध्यक्ष खाजाभाई बागवान, तक्वा फाऊंडेशनचे अध्यक्ष मुन्ना बागवान, नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष अवदुत पवार,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार,सुनीता पवार,महात्मा फुले ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य तसेच नोंदणीकृत कामगार या सर्वांच्या उपस्थित संत सावतामाळी मंदिर या ठिकाणी मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ संपन्न झाला.
ही योजना कोमल कन्ट्रक्शन कंपनी, श्री संत सावतामाळी सेवाभावी संस्था इंदापूर,महात्मा फुले ग्रुप,महात्मा फुले सत्यशोधक प्रतिष्ठान यांच्या प्रयत्नातून चालू झाली आहे.