उदगीर:धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस चार महिन्यांचा सश्रम कारावास; बारामती न्यायालयाचा निर्णय
नुकसानभरपाई म्हणून २ लाख ५० हजार रुपये देण्याचा आदेश

उदगीर:धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस चार महिन्यांचा सश्रम कारावास; बारामती न्यायालयाचा निर्णय
नुकसानभरपाई म्हणून २ लाख ५० हजार रुपये देण्याचा आदेश
बारामती वार्तापत्र
धनादेश न वटल्याप्रकरणी बारामती न्यायालयाने आरोपी विकास सर्जेराव काळे (रा. एमआयडीसी, बारामती) यांना चार महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून २ लाख ५० हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे.
ही रक्कम न दिल्यास आरोपीस आणखी एका महिन्याचा सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. हा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. प्रशांत काळे यांनी २० सप्टेंबर २०२५ रोजी दिला.
काय आहे प्रकरण?
फिर्यादी अक्षय एकनाथ दुधाळ (रा. मदनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) व आरोपी विकास काळे यांच्यात सन २०१७ मध्ये भिगवण येथील प्लॉट खरेदीबाबत व्यवहार झाला होता. या व्यवहारासाठी फिर्यादी यांनी आरोपीस २ लाख ५० हजार रुपये “विसार” म्हणून दिले होते. उर्वरित २ लाख रुपये खरेदीखतावेळी देण्याचे ठरले होते.
मात्र चौकशीत संबंधित प्लॉट हा आधीच दुसऱ्या कोणाला तरी विकल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने आपली रक्कम परत मागितली. त्यावर आरोपीने भारतीय स्टेट बँक, बारामती शाखेचा २ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश दिला. परंतु तो धनादेश बँकेत सादर केला असता खात्यातील अपुऱ्या शिल्लक रकमेमुळे पैसे मिळाले नाही.
न्यायालयीन कारवाई
या प्रकरणी फिर्यादी अक्षय दुधाळ यांनी न्यायालयात खटला दाखल केला. पुराव्यानंतर आरोपी विकास काळे यांच्यावर दोष सिद्ध झाला. न्यायालयाने आरोपीस चार महिन्यांचा सश्रम कारावास व फिर्यादीस २ लाख ५० हजार रुपये परत देण्याचा आदेश दिला. दंडाची रक्कम न दिल्यास आरोपीस आणखी एका महिन्याचा सश्रम कारावास भोगावा लागेल.
या खटल्यात फिर्यादी अक्षय दुधाळ यांच्यावतीने ॲड. पांडुरंग जगताप, ॲड. प्रणव लोदाडे, ॲड. ज्योती जगताप व ॲड. राहुल गवंड यांनी युक्तिवाद केला.