आपला जिल्हा

वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षपदी अशोक देवकर 

निवडीचे पत्र देऊन देवकर यांचे काैतुक...

वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षपदी अशोक देवकर 

निवडीचे पत्र देऊन देवकर यांचे काैतुक…

इंदापूर,आदित्य बोराटे –

इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथील अशोक देवकर यांची ‎वंचित बहुजन आघाडीच्या‎ इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी ‎निवड करण्यात आली आहे.‎ ‎

अशोक देवकर यांचा गेल्या अनेक वर्षापासून तळागाळातील‎ लोकांपर्यंत दांडगा संपर्क तसेच वंचित बहुजन समाजासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी अशोक देवकर यांची इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड केली आहे.

यानिमित्त‎ बारामती शहरातील प्रबुद्धनगर येथील कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे, तालुकाध्यक्ष कीर्तीकुमार वाघमारे, सोमनाथ खानेवाले यांचे हस्ते निवडीचे पत्र देऊन देवकर यांचे काैतुक केले.

या‎ निवडीबद्दल मित्र परिवार,‎ पदाधिकाऱ्यांसह सर्वत्र त्यांचे‎ कौतुक हाेत आहे. यापुढे वरिष्ठांच्या‎ आदेशाने गावागावात नव्याने वंचित‎ बहुजन आघाडीच्या शाखा स्थापन‎ करून पक्ष संघटन मजबूत‎ करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी‎ ग्वाही अशोक देवकर यांनी या वेळी‎ दिली.

Back to top button