बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिबिरात शेकडो महिलांची तपासणी
वैद्यकीय अधिकारी डॉ.गणराज चौगुले यांच्याकडून रुग्णांना फळे वाटप

बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिबिरात शेकडो महिलांची तपासणी
वैद्यकीय अधिकारी डॉ.गणराज चौगुले यांच्याकडून रुग्णांना फळे वाटप
इंदापूर, आदित्य बोराटे –
इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात केंद्र सरकारच्या संकल्पनेतून “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानांतर्गत मंगळवारी (दि.23) सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरात शेकडो महिलांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरात महिला व बालकांची विशेषज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, निदान, उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया, हाडांचे आजार, दंत तपासणी, आयुष तपासणी व औषधोपचार, किशोरवयीन मुलींची अशक्तपणा तपासणी व मासिक पाळी स्वच्छता व पोषणावरील जागरूकता सत्र, गर्भाशय व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड, वयोवंदना कार्ड नोंदणी व वितरण, रक्त, लघवी, थुंकी, कान-नाक-घसा, नेत्र तपासण्या व मानसिक आजार संदर्भात समुपदेशन प्रा.आ. केंद्र बिजवडीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणराज चौगुले तसेच डॉक्टर प्रवीण वाडेकर यांनी केले.तालुक्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणराज चौगुले यांनी फळेवाटप केले.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुवर्णा शिंदे, आरोग्य सहायिका कमल पांचाळ, आरोग्य सहायक देवेंद्र उत्तेकर,दत्तात्रेय झगडे, कनिष्ठ सहायक प्रवीण क्षीरसागर, आरोग्य सेविका रिझवाना तांबोळी,मनीषा दंडी,उज्ज्वला पवार , संदीप रायपुरे,अतुल तोंडे,विशाल भोंगळे,प्रतीक लोंढे,प्रवीण पोंदकुले, श्याम कांबळे,मझाहर मुलाणी, शिवाजी गोळे , आशा स्वयंसेविका आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.दत्तात्रय झगडे यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक केले तर देवेंद्र उत्तेकर यांनी रुग्णांचे आभार मानले.