बारामतीत दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाना बसणार आळा; डीवायएसपींना उपमुख्यमंत्र्यांनी मोका दाखल करण्याचे दिले आदेश
कोणतेही गुंडगिरी दादागिरी खपऊन घेतली जाणार नाही.

बारामतीत दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाना बसणार आळा; डीवायएसपींना उपमुख्यमंत्र्यांनी मोका दाखल करण्याचे दिले आदेश
कोणतेही गुंडगिरी दादागिरी खपऊन घेतली जाणार नाही.
बारामती वार्तापत्र
बारामतीत दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाना बसणार आळा डीवायएसपींना उपमुख्यमंत्र्यांनी मोका दाखल करण्याचे दिले आदेश
बारामतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर व मार्केटयार्ड परिसरात दहशत करणाऱ्या गुंडाना मकोका लावण्याचे आदेश दिले.
बारामती शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असून यामध्ये कोणतेही गुंडगिरी दादागिरी खपऊन घेतली जाणार नसल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
बारामतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दारूच्या पार्टी,कोयता घेऊन फिरणारे टुकार हे दहशत पसरवत आहेत.त्यामुळे अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.
चौकट;
बारामतीतील बस स्टॅन्ड मध्ये विद्रूपपणे फ्लेक्स लावणारे व त्यावर खिळे ठोकत आहेत ही बाब स्थानिक पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली त्यावर अजित पवार यांनी थेट गुन्हे दाखल करण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक बाबासाहेब राऊत यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
आता बारामतीचे डीवायएसपी सुदर्शन राठोड दोन्ही प्रकरणात काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.