शैक्षणिक

टी सी महाविद्यालयात आविष्कार अंतर्गत विविध र्धांचे यशस्वी आयोजन

चित्रकला स्पर्धेसाठी २२ विद्यार्थ्यांनी सहभाग

टी सी महाविद्यालयात आविष्कार अंतर्गत विविध र्धांचे यशस्वी आयोजन

चित्रकला स्पर्धेसाठी २२ विद्यार्थ्यांनी सहभाग

बारामती वार्तापत्र 

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती कनिष्ठ विभागाच्या वतीने अनेकांत आविष्कार अंतर्गत निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
यामुळे विद्यार्थ्यांना सृजनशीलता व अभिव्यक्ती कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळाली.चित्रकला स्पर्धेसाठी २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मी पाहिलेला गणेशोत्सव आणि माझी आवडती व्यक्तीरेखा या विषयावरील सुंदर चित्रे रेखाटली.
या विषयांमध्ये प्रथम कु. सोनल विजयप्रकाश विश्वकर्मा, द्वितीय शुभम कुंडलिक लोणकरआणि तृतीय राजेश्वरी संजय जाधव यांनी बक्षीसे पटकावली. निबंध स्पर्धेसाठी 40 विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. निबंध स्पर्धेसाठी निसर्ग संवर्धन काळाची गरज, डिजिटल युगातील विद्यार्थी जीवन आणि माझा आवडता कलावंत हे विषय देण्यात आले होते.
या विषयांमध्ये प्रथम अवनी गिरीश गांधी, द्वितीय जयहरी धनाजी कारंडे, तृतीय श्वेता अजिनाथ नलवडे यांनी बक्षीस मिळवले. वक्तृत्व स्पर्धेसाठी 14 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी आजचा विद्यार्थी आणि त्याचे आदर्श, मोबाईलचा शिक्षणातील सदुपयोग आणि पर्यावरण संवर्धन तरुणांची भूमिका हे विषय देण्यात आले होते.
या स्पर्धेत प्रथम वैष्णवी अनिल जाधव, द्वितीय प्रीती राजकुमार कोरे, तृतीय आर्यन नवनाथ घाडगे क्रमांकाचे बक्षीस मिळवले. चित्रकला स्पर्धेसाठी सौ रुपाली यशवंत तावरे, निबंध स्पर्धेसाठी डॉ. मुक्ता अंभेरे आणि डॉ. सुषमा जाधव तर वक्तृत्व स्पर्धेसाठी डॉ. नितीश सावंत आणि डॉ. सुनील खामगळ यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले .
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. जवाहरशेठ वाघोलीकर, सचिव मा. मिलिंद वाघोलीकर , प्राचार्य डॉ.अविनाश जगताप उपप्राचार्य प्रा.जी. टी.मोरे समन्वयक प्रा एस. पी.शेंडे आणि प्रा.आर. के. गोसावी यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रा. सोनल ब्राह्मणकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले.
Back to top button