जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयाचे आंतरशालेय नाटयछटा व कथाकथन स्पर्धेमध्ये घवघवीत यश
संस्कारक्षम कथा’

जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयाचे आंतरशालेय नाटयछटा व कथाकथन स्पर्धेमध्ये घवघवीत यश…
‘संस्कारक्षम कथा’
बारामती वार्तापत्र
बारामती येथील म. ए. सो. सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा, बारामती यांच्यातर्फे आयोजित आंतरशालेय नाटयछटा व कथाकथन स्पर्धेमध्ये जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये इ. १ ली व इ.२री या वर्गांच्या गटासाठी आयोजित आंतरशालेय नाटयछटा स्पर्धेमध्ये जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयाची इ.१ ली ची विद्यार्थिनी कु. गार्गी अभिषेक मोहिते हिने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
त्याचबरोबर इ.३री व इ.४ थी या वर्गांच्या गटासाठी आयोजित आंतरशालेय कथाकथन स्पर्धेमध्ये जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयाची इ.४ थी ची विद्यार्थिनी कु. रिदीप्ता अमरसिंह मारकड हिला विशेष सादरीकरणाचे पारितोषिक मिळाले आहे. या संबंधित दोन्ही स्पर्धांसाठी ‘संस्कारक्षम कथा’ हा विषय देण्यात आला होता तसेच या स्पर्धेमध्ये कु. स्वरांजली नरेंद्र देवकाते (इ.२ री) व कु. आराध्या सुनिल होळकर (इ. ३ री) या दोन विद्यार्थिनींना सहभाग प्रमाणपत्र मिळाले.
या स्पर्धेतील यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या प्राथमिक विभागाचे बाह्य स्पर्धा प्रमुख शिक्षक श्री. निलेश भोंडवे यांनी आणि या विदयार्थीनींच्या पालकांनी या स्पर्धेसाठी सहकार्य व मार्गदर्शन केले.
यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) प्रा.मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव प्रा.मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतीश धोकटे व सर्व संचालक, गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे आणि विद्यालायातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन व कौतुक केले.