शैक्षणिक

टि. सी. कॉलेजमध्ये क्विकहिल फाउंडेशनच्या मान्यवरांचा दौरा

एकूण २५,००० हून अधिक व्यक्तींना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करण्यात आले.

टि. सी.  कॉलेजमध्ये क्विकहिल फाउंडेशनच्या मान्यवरांचा दौरा

एकूण २५,००० हून अधिक व्यक्तींना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करण्यात आले.

बारामती  वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद  कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, बारामती (स्वायत्त) येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत आयोजित ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’* या उपक्रमाच्या यशस्वी पूर्णतेनंतर क्विकहिल फाउंडेशनचे सहयोगी संचालक श्री.अजयराज शिर्के तसेच ऍड. धनंजय जाचक यांनी महाविद्यालयाला दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सदिच्छा भेट दिली.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी बारामती परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये १२० हून अधिक प्रेझेंटेशन्स सादर केली. तसेच ६० हून अधिक इम्पॅक्ट अ‍ॅक्टिव्हिटीज, खासगी व शासकीय कार्यालये, व्यायामशाळा, महिला बचत गट इत्यादी ठिकाणी राबविणल्या. याशिवाय विद्यार्थ्यांनी एकूण ६ मास अ‍ॅक्टिव्हिटीज (१ कॅम्पसमध्ये व ५ कॅम्पसच्या बाहेर) आयोजित करून सायबर जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला. या माध्यमातून एकूण २५,००० हून अधिक व्यक्तींना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करण्यात आले.

या प्रसंगी दोन्ही मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले तसेच शैक्षणिक जीवनात अशा प्रकारच्या सायबर जागरुकता उपक्रमांचे सातत्याने आयोजन करावे असे प्रेरणादायी उद्गार काढले.

कार्यक्रमात सायबर सुरक्षा प्रवासाचे दर्शन घडवणारी पुस्तिका व व्हिडीओचे लोकार्पण करण्यात आले.

या उपक्रमात साहू अभय अजय, माने संदीप मच्छिंद्र, गुरव ज्योती धनाजी, धगे सायली शिवाजी, साळवे वरद सचिन, भोसले प्रणव पोपट, शिंदे बाळकृष्ण सुरेश, झिंजाडे यश शांतिलाल, जांभरे वृशाली बंडू, कांबळे माधवी पोपट, माने योगिता विजयकुमार, शेख सलोनी इक्बाल, बाचल शर्वरी पांडुरंग, केंद्रे गायत्री पद्माकर, कापसे प्रीती सचिन, गार्डी दीप्ती सुभाष, पोमणे निकिता विनायक, जाडकर दिशा संतोष, लोखंडे रोहन नानासो, काले सिद्धार्थ सचिन सदर  विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी या उपक्रमाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Back to top button