नवरात्र मध्ये महिलांचा ‘नवदुर्गां’ पुरस्काराने सत्कार
तालुका अध्यक्षा ज्योती लडकत यांच्या नेतृत्वाखाली

नवरात्र मध्ये महिलांचा ‘नवदुर्गां’ पुरस्काराने सत्कार
तालुका अध्यक्षा ज्योती लडकत यांच्या नेतृत्वाखाली
बारामती वार्तापत्र
नवरात्रीचे औचित्य साधून बारामती तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने नवदुर्गाचा सन्मान करण्यात आला. तालुका अध्यक्षा ज्योती लडकत यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
याप्रसंगी बारामती तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला यामध्ये लेखिका, उद्योजिका, पत्रकार, शेतकरी ,शैक्षणिक, सामाजिक, आदी क्षेत्रासह आपापल्या क्षेत्रात कर्तुत्वाने समाजामध्ये वेगळा ठसा उमटवला आहे .त्यांचा सत्कार करण्यात आला.
महिलांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे त्यांच्या कार्यास अधिक चालना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम खास नवरात्र महोत्सवामध्ये आयोजित केल्याचे ज्योती लडकत यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली सावंत यांनी केले.
नवदुर्गा पुरस्कार विजेत्या
उद्योजिका गौरी सावळेपाटील, शशिकला गटकळ ,संगीता घोलप, पूजा पवार, रूपाली ननवरे.
पत्रकारिता: भारती जगताप, मेघा गोलांडे, पल्लवी चांदगुडे.साहित्य: मंगला बोरावके, योगिता काळोखे ,अर्चना सातव कृषी: सपना हगवणे, शितल सावंत
शिक्षण: राजश्री आगम ,घनवट नीलिमा लडकत
सामाजिक: अंजू वाघमारे, प्रिया भोसले, गौरी गाडेकर, भाग्यश्री धायगुडे आदींचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
पुरस्कार मिळाल्याने प्रेरणा मिळाली, आत्मविश्वास वाढला व या पुढे जोमाने कार्य करणार असल्याचे पुरस्कार विजेत्या महिलांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले.