स्थानिक

उपमुख्यमंत्र्यांची सत्ता असलेल्या बारामती पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांने लाच घेतलेला व्हिडिओ झाला व्हायरल

कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का?

उपमुख्यमंत्र्यांची सत्ता असलेल्या बारामती पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांने लाच घेतलेला व्हिडिओ झाला व्हायरल

कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का?

बारामती वार्तापत्र 

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी आणत असतात.बारामती पंचायत समितीतील बांधकाम विभागातील शिवकुमार शंकर कुफल याने एका ठेकेदाराकडून २९ हजार रुपयांची लाच घेतलीं आहे.हे पैसे त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये स्वीकारले. आणि हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

त्या लाच घेतलेल्या कर्मचाऱ्यांने लाचेचा व्हिडिओ संबंधित ठेकेदारांनी काढला आहे.असे समजल्यानंतर त्याने एक लाख रुपये त्या ठेकेदाराच्या अकाउंट वर पाठवले.

अजित पवार बारामतीसाठी कोटींचा निधी आणत असताना शासकीय अधिकारी मात्र सुधारताना दिसत नाहीत. कोणत्याही कामाचे टेंडर निघाले की हे अधिकारी स्वतःचे कमिशन घेतल्याशिवाय हे काम त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळवून देत नाही. आता या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Back to top button