
बारामती बाजारपेठेतील आकर्षक विद्युत रोषणाई वेधून घेत आहे नागरिकांचे लक्ष
खरेदीची लगबग सुरू
बारामती वार्तापत्र
बारामतीमधील मारवाड पेठ येथील येणाऱ्या दिवाळीच्या सणासाठी व्यापारी असोसिएशनने केलेली आकर्षक विद्युत रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
दिवाळी सण जवळ आल्याने सर्वत्र खरेदीची लगबग सुरू झाली आहे. बारामती शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर बाजारपेठांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असून कपडे,मिठाई, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि सजावटीच्या साहित्यांची खरेदीसाठी झुंबड उडते.कंपन्या आणि व्यापारी देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती ऑफर्स देत आहेत.
बारामतीमधील बाजारपेठेमध्ये दिवाळीच्या सणामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. नागरिकांनी ऑनलाईन खरेदी न करता स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करावी असे आवाहन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खुंटाळे यांनी केले आहे.