माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदी विशाल जगताप व रामदास आटोळे यांची निवड
प्रचाराच्या वेळी ज्या गटातून जास्त मतदान होईल त्या गावातून स्वीकृत

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदी विशाल जगताप व रामदास आटोळे यांची निवड
प्रचाराच्या वेळी ज्या गटातून जास्त मतदान होईल त्या गावातून स्वीकृत
बारामती वार्तापत्र
पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व राज्याचे उपमुख्यमंत्री चेअरमन असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.अखेर स्वीकृत संचालक पदी खंlडज येथील रामदास तुकाराम आटोळे व मानाजीनगर येथील विशाल केशवराव जगताप यांची आज निवड करण्यात आली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. ही निवडणूक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःमीच चेअरमन होणार असं सांगून हातामध्ये घेतली होती.
यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलला एक हाती सत्ता मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराच्या वेळी ज्या गटातून जास्त मतदान होईल त्या गावातून स्वीकृत संचालक घेणार असे जाहीर केले होते.व आज ही स्वीकृत संचालक पदाची नावे जाहीर करण्यात आली.