इंदापूर

इंदापुरात अतिवृष्टीची मदत २,५०० रुपये जमा; मोबाईलवरील मेसेज दाखवत शेतकऱ्याचा संताप…

तत्पूर्वी सरकारने २२१५ कोटी रुपयांची मदतही जाहीर केली

इंदापुरात अतिवृष्टीची मदत २,५०० रुपये जमा; मोबाईलवरील मेसेज दाखवत शेतकऱ्याचा संताप…

तत्पूर्वी सरकारने २२१५ कोटी रुपयांची मदतही जाहीर केली

इंदापूर;प्रतिनिधि

राज्यात गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. मराठवाड्यातीलधाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आला होता.

या पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली आहेत, तर काही ठिकाणी शेतातील मातीही वाहून गेली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे केले. तत्पूर्वी सरकारने २२१५ कोटी रुपयांची मदतही जाहीर केली. मात्र, शेतकऱ्यांना ही मदत कुठपर्यंत पुरणार असा प्रश्न आहे.

त्यातच, मे महिन्यात मिळालेल्या मदतीनंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मे महिन्यात अतिवृष्टीने (Flood) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इंदापूर तालुक्यातील सणसर गावच्याशेतकऱ्याचे पावणे दोन लाखांचे नुकसान झाले होते, पण सरकारकडून त्यांस केवळ २५५० रुपये मदत मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्याचे जवळपास पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्यानंतर तब्बल अडीच हजार नुकसान भरपाई आल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. आता, हेच पैसे आम्ही कृषीमंत्र्यांना देणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील सुमितनिंबाळकर यांना ही मदत आली असून इतर शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील बुहतांश जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे.

आर्थिक संकटात सापडेल्याशेतकऱ्यांना आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. मात्र, मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत मिळण्यास सुरुवात झाली असून मिळणारी मदत अत्यंत तोडकी असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

तसेच, हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मे आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं असून शेतकरी आक्रमक झाले आहेत. जर आम्हाला मदत करायची असेल तर भरीव स्वरूपाची करा, अन्यथा शेतकऱ्यांची थट्टा करू नका, अशी भावना संतप्त शेतकऱ्यांची आहे. जरी आम्हाला मदत आली तरी आम्ही ती मदत सरकारला परत देऊ, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय.

मे महिन्यातील अतिवृष्टीसाठी मदतीचे निधी वाटप 

राज्यात फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत “अवकाळी पाऊस व गारपीट” यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांचेकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले होते. त्याअनुषंगाने शासनाने मदतीचे पॅकेज देखील जाहीर केले होते.

फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये ३३७ कोटी ४१ लक्ष ५३ हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी दिली होती. आता, शासनाने मंजूर केलेला हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे.

हेक्टरी ५० हजारांची मागणी 

दरम्यान, राज्यात जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५०.०५ हेक्टरवरील शेत पिकाच्यानुकसानीपोटी १३३९ कोटी ४९ लाख २५ हजाराच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी यापू्र्वी दि दिली होती. शासनाकडून आता ती देखील मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, गेल्या १०-१५दिवसांत झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडूनहोतआहे.

Back to top button