
बारामती अंतरप्रेनर्स क्लब च्या वतीने पूरग्रस्तांना मदत
४१० कुटूंबियांना देण्यात आले.
बारामती वार्तापत्र
बारामती एमआयडीसी येथील बारामती अंतरप्रेनर्स
क्लबच्या उद्योजकांनी अतिवृष्टी झालेल्या व पूरग्रस्त झालेल्या गावांना मदत केली आहे.या मध्ये जीवनाक्षक वस्तू चे विविध किट तयार करून ४१० कुटूंबियांना देण्यात आले.करमाळा ,माढा, भूम परांडा,बार्शी या तालुक्यातील पूरग्रस्तांना सदर मदत देण्यात आली.
बारामती पेन्सिल चौक येथून रविवार ५ ऑक्टोबर ला टेम्पो पाठविण्यात आला.
या प्रसंगी उद्योजक सचिन माने ,अरुण म्हसवडे ,कृष्णा ताटे ,जालिंदर माघाडे, रमाकांत पाडोळे , संजय थोरात ,पंढरीनाथ कांबळे,व संजय गोलांडे उपस्तीत होते.
विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करण्यात नेहमी बारामती अंतरप्रेनर्स क्लब पुढाकार घेत असतो या नंतर सुद्धा पूर ओसरल्यावर रोगराई ची बाधा होऊ नये म्हणून औषध, गोळ्या , प्राथमिक आरोग्य साहित्य दिले जाणार असल्याचे बारामती अंतरप्रेनर्स क्लब च्या वतीने सर्व उद्योजक यांनी सांगितले.