स्थानिक

बारामतीत शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘सैनिक सन्मान अभियान’ राबविले

आवाहनाला तालुक्यातून चांगला प्रतिसाद

बारामतीत शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘सैनिक सन्मान अभियान’ राबविले

आवाहनाला तालुक्यातून चांगला प्रतिसाद

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) युवा नेते युगेंद्र पवार यांच्या पुढाकाराने एक सामाजिक उपक्रम — ‘सैनिक सन्मान अभियान’ राबविण्यात आले. या उपक्रमाचे उद्दिष्ट बारामती तालुक्यातील आजी व माजी सैनिकांना सन्मानित करणे व त्यांच्या कुटुंबांना सहकार्य करण्याचे आहे.

युगेंद्र पवार यांनी बारामतीमधून अभियानाची सुरुवात करताना सांगितले की “देशासाठी आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या जवानांचे योगदान शब्दांत मांडता येणार नाही. त्यांच्यासाठी आपण काही करू शकलो, तर तोच खरा देशसेवा समजावी.”

या उपक्रमाअंतर्गत बारामती तालुक्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना विविध स्वरूपात मदत करण्याचा मानस व्यक्त करत, युगेंद्र पवार यांनी नागरिकांना आवाहन केले की, “या अभियानात सहभागी होऊन अधिकाधिक मदत करावी, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.”

या आवाहनाला तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक नागरिक, व्यापारी, संस्थाचालक आणि युवा वर्ग यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.

Back to top button