स्थानिक

बारामती चे सुपुत्र जितेंद्र जाधव यांना बेस्ट सी.ई.ओ.पुरस्कार

'ट्रेंड फ्लॉग ' च्या वतीने दिल्लीत सन्मान

बारामती चे सुपुत्र जितेंद्र जाधव यांना बेस्ट सी.ई.ओ.पुरस्कार

‘ट्रेंड फ्लॉग ‘ च्या वतीने दिल्लीत सन्मान

बारामती वार्तापत्र 

ट्रेंड फ्लॉग दिल्ली येथील संस्थेच्या वतीने भारतातील १० सी.ई.ओ.(चीफ ऑपरेटर ऑफिसर ) यांना त्यांच्या कार्याबद्दल उत्कृष्ट सी. ई. ओ. पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहेत.

या मध्ये बारामती चे सुपुत्र जितेंद्र जाधव यांचा समावेश आहे.
गेली २५ वर्षा पासून कार्पोरेट क्षेत्रात काम करत असल्याचा अनुभव,५०० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी हाताळण्याची क्षमता,नेतृत्वगुण ,प्रेरक पद्धतीने काम करण्याची क्षमता, कंपनीची प्रगती करणे व देशाला कंपनीचा फायदा कसा होतो, रोजगार निर्मिती,पर्यावरण आदी बाबी विचारात घेऊन सदर पुरस्कार दिला जातो भारतातील १०० अधिकारी यांची विविध कंपन्यांमधून निवड केली होती व त्यामधून फक्त १० अधिकाऱ्यांना सदर पुरस्कार दिला गेला आहे.

पुरस्कार वितरण प्रसंगी मुख्य संचालिका अनामिका साहू व संचालक दिनेश कुमार, विकास कुमार व विविध कंपन्याचे अधिकारी उपस्तीत होते.

जितेंद्र जाधव सद्या एच. आर.एस .प्रोसेस सिस्टिम या कंपनी मध्ये उपाध्यक्ष म्हणून (VP, opretion) कार्यरत असून या पूर्वी त्यांनी बारामती एमआयडीसी मधील श्रायबर डायनॅमिक्स डेअरी कंपनी मध्ये प्रकल्प प्रमुख, संचालक पदावर काम केले आहे.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Back to top button