स्थानिक

पंचायत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत कार्यक्रमाचे बारामतीत आयोजन

इच्छुक रहिवाशांनी आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास वेळेत उपस्थित राहावे

पंचायत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत कार्यक्रमाचे बारामतीत आयोजन

इच्छुक रहिवाशांनी आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास वेळेत उपस्थित राहावे

बारामती वार्तापत्र 

पंचायत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत कार्यक्रमाचे १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता कवीवर्य मोरोपंत सभागृह, इंदापूर रोड, बारामती येथे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत, याकरिता सोडतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाकरिता उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची निरीक्षण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

तरी पंचायत समिती क्षेत्रातील इच्छुक रहिवाशांनी आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.

Back to top button