बारामती नगर पालिकेची आरक्षण सोडत जाहीर काही खुश तर काही नाखुश
नगरपरिषदेमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्याने 41 पैकी 21 जागांवर महिलांना संधी मिळणार असल्याने महिलावर्गातही आतापासूनच उत्साहाचे वातावरण आहे.

बारामती नगर पालिकेची आरक्षण सोडत जाहीर काही खुश तर काही नाखुश
नगरपरिषदेमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्याने 41 पैकी 21 जागांवर महिलांना संधी मिळणार असल्याने महिलावर्गातही आतापासूनच उत्साहाचे वातावरण आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षानंतर होत आहे. नगराध्यक्ष पदासाठी खुल्या प्रवर्गातील आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज नगरपालिकेचे प्रभागामधील आरक्षण जाहीर करण्यात आले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, मुख्याधिकारी पंकज भुसे तसेच इतर अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
बारामती नगरपालिकेच्या प्रभागामध्ये महिला आरक्षण पडल्यामुळे पुरुष मंडळींची अडचण झाली आहे जे नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करत होते.
त्यांना आता यंदाच्या पाच वर्षे तरी थांबावं लागणार आहे. जरी पुरुष आरक्षण नसले तरी जे उमेदवार नगरपालिकेसाठी इच्छुक होते ते उमेदवार आपल्या पत्नीसाठी फिल्डिंग लावण्याची दाट शक्यता आहे.
प्रभागनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे-
प्रभाग एक- अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला, प्रभाग दोन- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला व सर्वसाधारण, प्रभाग तीन- नागरिकांचा मागासप्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग चार- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग पाच- नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग सहा- सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग सात- नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग आठ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग नऊ- नागरिकांचा मागासप्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग दहा- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग अकरा- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग बारा- अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग तेरा- अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग चौदा- अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग पंधरा- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग सोळा- अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला, प्रभाग सतरा- नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग अठरा- अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला, प्रभाग एकोणीस- अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग वीस- अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला.