बारामती एमआयडीसी रस्ता गेली दोन आठवडे स्पीड ब्रेकरच्या कामासाठी बंद; सणासुदीच्या तोंडावर नागरिकांचे होतेय गैरसोय
काम संत गतीने सुरू

बारामती एमआयडीसी रस्ता गेली दोन आठवडे स्पीड ब्रेकरच्या कामासाठी बंद; सणासुदीच्या तोंडावर नागरिकांचे होतेय गैरसोय
काम संत गतीने सुरू
बारामती वार्तापत्र
बारामती एमआयडीसी रस्ता, स्पीड ब्रेकरच्या कामासाठी गेली दोन आठवडे कॉन्ट्रॅक्टरने बेकायदेशीर रित्या बंद ठेवलेला आहे.यासाठी कलेक्टरची परवानगी लागते अशी माहिती आहे?
ऐन दिवाळीच्या तोंडावर नागरिकांची ब्रेकरच्या कामामुळे रस्ता बंद केल्यामुळे गैरसोय होत आहे. वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे.स्पीड ब्रेकर चे काम ज्या खात्याचे अंतर्गत येते त्या खात्याने तरी याबाबत लक्ष देऊन हा बेकायदेशीरपणे बंद केलेला स्पीड ब्रेकरचा रस्ता चालू करावा अशी नागरिकांची मागणी आहे.
बारामती शहरात इतर भागातही स्पीड ब्रेकर चे डीव्हायडर करण्याचे काम संत गतीने सुरू आहे त्यामुळे नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे यामुळे एक्सीडेंट चे प्रमाण देखील वाढले आहे. सुरुवातीलाच या स्पीड ब्रेकर मुळे काही मृत्यू झाल्याच्या ही घटना घडली आहेत आत्तापर्यंत बारामती शहरात 30 ते 40 एक्सीडेंट स्पीड ब्रेकर मुळे झाले आहेत.
तसेच बेकायदेशीरपणे बंद केलेल्या रस्त्याबाबत काय कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.