काटेवाडी सोसायटी चेअरमनपदी बाळासाहेब वायसे यांची बिनविरोध निवड
सदस्यांनी मोठ्या उत्साहामध्ये या दोघांचे स्वागत

काटेवाडी सोसायटी चेअरमनपदी बाळासाहेब वायसे यांची बिनविरोध निवड
सदस्यांनी मोठ्या उत्साहामध्ये या दोघांचे स्वागत
बारामती वार्तापत्र
काटेवाडी येथील काटेवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाळासाहेब वायसे तर व्हा. चेअरमनपदी सुभाष वाघ यांची बिनविरोध निवड झाली. या दोघांची बिनविरोध निवड झाल्याने गावातील नागरिकांनी व सदस्यांनी मोठ्या उत्साहामध्ये या दोघांचे स्वागत केले.
काटेवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन विजयसिंह काटे व व्हाईट चेअरमन दत्तात्रय खरात यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी चेअरमन पदासाठी बाळासाहेब वायसे व व्हा. चेअरमन पदासाठी सुभाष वाघ यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंध बारामती प्रमोद दुरगुडे यांनी चेअरमनपदी बाळासाहेब वायसे व व्हा. चेअरमनपदी सुभाष वाघ यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
या निवडी वेळी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काटे, माजी सरपंच विद्याधर काटे, दासानाना काळे, मारुती मासाळ, नितीन काटे, स्वप्निल काटे, प्रमोद काटे, नितीन माने, सचिव बाळासाहेब जाधव, अमोल कोलते उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन बाळासाहेब वायसे म्हणाले की, आजपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काटेवाडी सोसायटीचा कारभार उत्तमरीत्या चाललेला असून त्याच पद्धतीचा कारभार इथून पुढील काळात देखील केला जाईल.
त्यामुळे सोसायटीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांची कामे मार्गे लावण्याचे काम चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व सदस्य मिळून आम्ही करणार असल्याचे मत बाळासाहेब वायसे यांनी व्यक्त केले.