शैक्षणिक

पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल विद्यालयातर्फे शालेय साहित्य जमा

विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात

पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल विद्यालयातर्फे शालेय साहित्य जमा

विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात

बारामती वार्तापत्र 

बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयांमध्ये पूरग्रस्त भागातील विद्यार्थांसाठी मोठ्या प्रमाणात शालेय साहित्याचे संकलन करण्यात आलेले आहे.सप्टेंबर महिन्यात आलेल्या अतिवृष्टीने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये महापूर आला आणि यामध्ये अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात शेती,घर,जनावरे,यांचे नुकसान झाले.

तसेच पुराचे पाणी घरामध्ये शिरल्याने विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य वाहून गेले तसेच ते पूर्ण खराब झाले.

या भागातील विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात म्हणून शालेय साहित्य जमा करण्याचे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य श्री भगवान भिसे यांनी केले होते.त्याला प्रतिसाद म्हणून विद्यार्थांनी,वह्या, पेन,पेन्सिल, कंपासपेटी, स्कूलबॅग,असे विविध प्रकारचे शालेय साहित्य जमा केले.

हे सर्व साहित्य विद्यालयातून या विद्यार्थांसाठी जाणार आहे.

साहित्य जमा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक विद्यालयाचे प्राचार्य भगवान भिसे,उपमुख्याध्यापक श्री सतीश पाचपुते,पर्यवेक्षिका सौ. अलका चौधर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

विद्यालयाच्या या उपक्रमाबाबत स्थानिक स्कूल कमिटी चे सदस्य श्री सदाशिव (बापू) सातव, व सर्व पालक यांनी समाधान व्यक्त केले.

Back to top button