आता बारामतीत दोन हजार हायवा घेऊन चक्का जाम करणार हायवा संघटनेचा प्रशासनाला इशारा
संघटनेने पोलिस पत्रकारांवर सुद्धा केले आरोप?

आता बारामतीत दोन हजार हायवा घेऊन चक्का जाम करणार हायवा संघटनेचा प्रशासनाला इशारा
संघटनेने पोलिस पत्रकारांवर सुद्धा केले आरोप?
बारामती वार्तापत्र
बारामतीत हायवामुळे तीन ते चार मृत्यू झाल्यानंतर हायवा वाहतुकीला काही बंधने घालण्यात आली.गौण खनिज वाहतूक करणा-या हायवा, टिपर व डंपर यांना बारामती शहरात 24 तास वाहतूकीस परवानगी न दिल्यास आपल्या दोन हजार वाहनांसह येत्या गुरुवारी (ता. 16) सर्व वाहन व्यावसायिक बारामतीत चक्का जाम करणार आहेत.असा इशारा संघटनेणे दिला आहे.
या संदर्भातील निवेदन प्रशांत नाना सातव यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेच्या पदाधिका-यांनी सोमवारी (ता. 13) उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना दिले आहे. शहरातील भिगवण चौकात आपल्या दोन हजार वाहनांसह सर्व वाहनचालक व मालक येतील व चक्का जाम आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केले आहे की या पूर्वी प्रशासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन संघटनेने केले आहे, मात्र रात्रीच्या वेळेस डोंगरमाथ्यावरील खडी क्रशर पॉईंटवर जाऊन ही वाहतूक करणे अधिक धोकादायक ठरत आहे.
बहुसंख्य वाहन मालकांनी बँकेतून कर्ज काढून वाहने विकत घेतली आहेत, या बंदीमुळे व्यवसायावरच गदा येत असून आर्थिक संकट निर्माण होत असून बँकेचे हप्ते भरणे अवघड झाले आहे.
वाहतूक पोलीस आणि काही पत्रकारांवर गंभीर आरोप :निवेदनात बारामती शहर वाहतूक शाखेच्या काही अधिकाऱ्यांवर आणि स्थानिक पत्रकारांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संघटनेच्या म्हणण्यानुसार, “वाहतूक पोलीसांनी ‘अपघातमुक्त बारामती’ या नावाने तयार केलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील काही पत्रकार आमच्या गाड्यांविरोधात तक्रारी करतात आणि पोलीसांकडून दंड वसुलीचे प्रकार घडत आहेत. काही पत्रकार आमच्या वाहनांना अडवून थेट पैशांची मागणी करत आहेत.!
इतर अवजड वाहतूक सुरुच
इतर ट्रक, टँकर, बसेस या सारख्या मोठया वाहनांची वाहतूक शहरातून 24 तास सर्रास सुरु असताना फक्त गौण खनिज वाहनांवरच अन्याय का असाही सवाल या निमित्ताने या संघटनेने उपस्थित केला आहे.
१६ ऑक्टोबरला भिगवण चौकात मोठा चक्का जाम! : संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे – “जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर १६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९ ते सकाळी ८ या वेळेत बारामती-दौंड-इंदापूर परिसरातील २२०० ते २५०० ट्रक, हायवा, टिपर व डंपरसह भिगवण चौक ठप्प केला जाईल. असा इशारा दिला आहे.