बारामतीत होणार डि.जे. बंदी: राजकीय व सामाजिक संस्थेकडून निवेदन, प्रशासनाकडून स्वागत
कृती समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामतीत होणार डि.जे. बंदी: राजकीय व सामाजिक संस्थेकडून निवेदन, प्रशासनाकडून स्वागत
कृती समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील विविध 39 सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने बारामती तालुका परिसरात कायमची डि.जे. व लेजर बीम लाईट बंदी करणेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांना लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे.
बारामती परिसरात विविध कार्यक्रमात न्यायालयाची बंदी असताना डि.जे. वाजविला जातो व लेजर बीम लाईटचा सर्रासपणे वापर केला जातो. यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी रूग्ण, पाळीव प्राणी पक्षी यांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागतो.
या सर्व बाबींचा विचार करून कायम स्वरूपाची बंदी घालावी असे विविध सामाजिक संघअना व राजकीय पक्षांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
या निवेदनाच्या प्रती
याप्रसंगी श्री.राठोड बोलताना सांगितले की, तुमच्या सारखी सुज्ञ लोकं पुढे येऊन जो डि.जे.बंदीचा निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे.
यामध्ये कृती समिती स्थापन करावी. येणाऱ्या सण, उत्सवावेळी कृती समितीला बोलावून जनजागृती करता येईल. जर डि.जे. लावणाऱ्यांनी नाही ऐकले तर कायदा आहेच असेही ते म्हणाले. वेळोवेळी आम्ही कारवाई करतोच, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी आपआपल्या संघटनेत यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.
यापुढे बारामतीत डि.जे.वाजवू देणार नाही तसे आदेश काढण्यात येईल असेही ते म्हणाले.
यावेळी विविध पक्षाचे व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी कृती समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.