प्रभाग क्रमांक 2 मधून जनसेवक गणेश तानाजी देवकर इच्छुक
भाजपाचे भटक्या विमुक्त जातीचे शहराध्यक्ष गणेश तानाजी देवकर यांचीही उडी...

प्रभाग क्रमांक 2 मधून जनसेवक गणेश तानाजी देवकर इच्छुक
भाजपाचे भटक्या विमुक्त जातीचे शहराध्यक्ष गणेश तानाजी देवकर यांचीही उडी…
इंदापूर,प्रतिनिधी –
इंदापूर नगर परिषदेचे आरक्षण जाहीर होताच शहरातील सामाजिक कार्यकर्ते,जनसेवक,लोकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या,युवकांनी नगरसेवक पदासाठी धावपळ सुरू केली आहे.यामध्ये भाजपाचे भटक्या विमुक्त जातीचे शहराध्यक्ष गणेश तानाजी देवकर यांनीही उडी घेतली आहे.शहरातली प्रभाग क्रमांक दोन मधून सर्वसाधारण जागेवर मी इच्छुक असल्याचे त्यांनी बारामती वार्तापत्र शी बोलताना सांगितले.
प्रभाग क्रमांक दोन मधील वडार गल्ली,श्रीराम सोसायटी,पंचायत समिती परिसर,महात्मा फुले नगर,या प्रभाग क्रमांक दोन मधील भागामध्ये,उच्चशिक्षित तरुणांची संख्या अधिक आहे.आजही ते तरुण मोलमजुरी करत आहेत.हे अतिशय दुर्दैवी आहे.प्रभागामध्ये महिलांची संख्या ही अधिक आहे.बहुतांश महिला धुणीभांडी आणि मोलमजुरी करीत आहेत.त्यांना शाश्वत आर्थिक उत्पन्न नाही.तसेच त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी,स्थानिक समस्यांना न्याय देण्यासाठी,नगरसेवक पदासाठी मी इच्छुक आहे. असेही गणेश देवकर यांनी सांगितले.
भटक्या विमुक्त जाती तसेच सामाजिक कार्याच्या माध्यमातून, मागील सहा वर्षापासून पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिका व त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी अशा विविध उपक्रमातून सामाजिक सेवेत आहे. सामाजिक सेवेची मला आवड आहे. परंतु ही सामाजिक सेवा करीत असताना,आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना,योग्य न्याय देण्यासाठी संविधानिक पद असणे आवश्यक आहे.त्यामुळे मी नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे.त्या माध्यमातून समाजाची आणि समाजातील अन्यायग्रस्तांची मला सेवा करायची आहे.
अपक्ष उमेदवार,भाजपाचे युवानेते प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. त्यामुळे माने परिवार माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याचा विचार करून मला नक्कीच संधी देतील,असा मला पूर्ण विश्वास आहे.