स्थानिक

बारामती तालुक्यातील हजाराहून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग भत्याचे वितरण

उर्वरित सहा महिन्यांच्या भत्याचे वितरण मार्च २०२६ मध्ये

बारामती तालुक्यातील हजाराहून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग भत्याचे वितरण

उर्वरित सहा महिन्यांच्या भत्याचे वितरण मार्च २०२६ मध्ये

बारामती वार्तापत्र 

समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद पुणे यांनी मंजूर केलेल्या बारामती तालुक्यातील एकूण १ हजार ९२ दिव्यांग लाभार्थ्यांचा दरमहा ५०० रुपये प्रमाणे दिव्यांग भत्ता मंजूर करण्यात आला आहे.

सहा महिन्यांचा एकत्रित भत्ता एकूण ३ हजार रुपये याप्रमाणे एकूण ३२ लाख ४९ हजार इतकी रक्कम पंचायत समिती, बारामती यांच्या माध्यमातून १६ ऑक्टोबर २०२५ रोजी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

ही रक्कम दिवाळीपूर्वी वितरित करण्यात आल्यामुळे दिव्यांग नागरिकांच्या आनंदात अधिक भर पडली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्यावतीने दिव्यांगांच्या दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, उर्वरित सहा महिन्यांच्या भत्याचे वितरण मार्च २०२६ मध्ये करण्याचे नियोजन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे, अशी माहिती गट विकास अधिकारी किशोर माने यांनी दिली आहे.

Back to top button