
इंदापूरात रंगली संगीतमय दिवाळी पहाट
समाजात सांस्कृतिक जाणीव आणि आनंदाचे वातावरण..
इंदापूर,आदित्य बोराटे –
इंदापुरातील स्व.मंगेशबाबा पाटील प्रतिष्ठान, पतंजली योग समिती व माजी नगरसेवक शेखर पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संगीतमय दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम दिवाळीच्या मंगल वातावरणात उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी बालगंधर्व पुरस्कारप्राप्त कलाकार पुणे तसेच स्वरगंध ग्रुप इंदापूरच्या गायकांनी सादर केलेल्या सुरेल, सुश्राव्य पहाटगीतांच्या मैफिलीने इंदापूरकरांची मने जिंकली.
या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत अशा उपक्रमांमुळे समाजात सांस्कृतिक जाणीव आणि आनंदाचे वातावरण निर्माण होत असल्याचे सांगितले.
यावेळी प्रा.कृष्णा ताटे,पांडुरंग शिंदे, अविनाश कोथमीरे, संतोष देवकर, रणजीत चौधरी, दीपक मगर, अभिजीत पाटील, नितीन मस्के, निलेश शिंदे, सुहास नवगिरे, पांडुरंग व्यवहारे, गोपीचंद गलांडे, जयकुमार शिंदे, मल्हारी गाडगे आदी उपस्थित होते तर सूत्रसंचालन रवींद्र परबत यांनी केले.