स्थानिक
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या लेकीला मेडिकलला प्रवेश, पवारांकडून गोविंदबाग बारामतीत अभिनंदन
सर्व स्तरातून तिचे कौतुक

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या लेकीला मेडिकलला प्रवेश, पवारांकडून गोविंदबाग बारामतीत अभिनंदन
सर्व स्तरातून तिचे कौतुक
बारामती वार्तापत्र
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी गोविंदबाग, बारामती येथे शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीमागचे प्रमुख कारण म्हणजे, सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिला यावर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. वडिलांना गमावल्यानंतरही प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने शिक्षण घेऊन हे मोठे यश मिळवल्याबद्दल शरद पवार वैभवीचे विशेष अभिनंदन केले आणि तिला पुढील शिक्षणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, देशमुख कुटुंबीय, खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. वैभवीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.