इंदापूर

इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्री एसटीला लागली आग…. क्षणात एसटी जळून झाली खाक……

मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास घडली घटना

इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्री एसटीला लागली आग…. क्षणात एसटी जळून झाली खाक……

मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास घडली घटना……

एसटीत 50 प्रवासी सुदैवानं कोणतीही जीवित घटना नाही…….

इंदापूर;प्रतिनिधि

इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्रीच्या सुमाराला अचानक उभ्या राहिलेल्या एसटीला आग लागली आणि काही समजायच्या आत या आगीत संपूर्ण एसटी जळून खाक झालीय. या एसटीमध्ये जवळपास 50 प्रवासी होते सुदैवानं कोणालाही इजा झाली नसली तर या प्रवाशांचं साहित्य मात्र जळून राख झालंय.

एम एच 20 बी एल 4233 क्रमांकाची ही धाराशिव पुणे बस मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास इंदापूर बस स्थानकाच्या फलाट क्रमांक 11 वर आली. याच वेळी इंधन गळतीमुळे या बसला अचानक आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.

ज्यावेळी आग लागली त्यावेळी बस मध्ये जवळपास 50 प्रवासी होते त्यामुळे अचानक एकच गोंधळ उडाला प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला. तात्काळ अग्निशामक बोलावून ही आग आटोक्यात आणली मात्र या आगीत बसचा पूर्ण नुकसान झालंय…

Back to top button