बारामती तालुक्यातील नीरा-मोरगाव मार्गावर बोलेरोचा भीषण अपघात ; सात वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, आजोबा गंभीर जखमी
टँकरला चुकवताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात

बारामती तालुक्यातील नीरा-मोरगाव मार्गावर बोलेरोचा भीषण अपघात ; सात वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, आजोबा गंभीर जखमी
टँकरला चुकवताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात
नीरा ;प्रतिनिधि
पुरंदर आणि बारामती तालुक्याच्या सीमेवरून जाणाऱ्या नीरा-मोरगाव मार्गावर नीरा नजीक चौधरवाडी गावच्या हद्दीत रविवारी (दि.२६) दुपारी बोलेरो जीपचा भीषण अपघात झाला.
दुर्घटनेत सात वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाले आहेत. मुलीला सासरी सोडून नातवासह घरी परतताना टँकरला चुकवताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.स्वराज्य अजित मेमाणे (वय ७), असे मृत्यू झालेल्या नातवाचे नाव आहे.
राधुनाथ बबन मेमाणे (वय 50) हे गंभीर जखमी झाले आहेत. आजोबा आणि नातू हे दौंड तालुक्यातील खोपोडी येथील राहिवासी आहेत. दिवाळीनंतर आपल्या मुलीला सासरी सोडण्यासाठी राधुनाथ मेमाणे गडदरवाडी येथे आले होते. परतीच्या प्रवासात बोलेरो जीपला समोरून आलेल्या टँकरला चुकवताना वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बोलेरो रस्त्याच्या कडेला जाऊन दगडाला धडकली. यामध्ये 7 वर्षाच्या स्वरजला गंभीर दुखापत झाली.
अपघात इतका भीषण होता की, लहान स्वराजचा जागीच मृत्यू झाला, तर राधुनाथ मेमाणे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नीरा पोलीस चौकीचे कर्मचारी संदिप मदने, कोळेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना नीरा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






