क्राईम रिपोर्ट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बारामतीच्या नामांकित उद्योगपती वर  बलात्काराचा गुन्हा दाखल

फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बारामतीच्या नामांकित उद्योगपती वर  बलात्काराचा गुन्हा दाखल

फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

बारामती वार्तापत्र 

बारामती मध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर उद्योगपती मनोज तुपे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.मनोज तुपे यांनी सामाजिक कार्य करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यामध्ये बऱ्याचदा मनोज तुपे दिसत असतात.आत्ताच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी साठी ही बडे उद्योजक काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जवळीक साधना दिसत होते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर बारामतीच्या एका नामांकित उद्योगपतीने विविध ठिकाणी पीडितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.याप्रकरणी पुणे शहरात या उद्योगपतीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय..मनोज कुंडलिक तुपे ( रा.ग्रीन पार्क,विद्या प्रतिष्ठाण जवळ ) असे या बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या उद्योगपतीचे नाव आहे.याप्रकरणी पीडीतीने सांगितलेल्या आपबितीनुसार मनोज तुपेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,सन 2021 ते 15/10/2025 च्या कालावधीत ही घटना घडलीये.पीडितेने दिलेल्या फिर्यादी नुसार,सन 2020 मध्ये पीडीतेने आपले शिक्षण पूर्ण करून एमपीएससीची तयारी करण्याचे ठरविले.यामुळे यानंतर पीडितेने पुण्यामध्ये अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यासासाठी ती पुण्यात राहायला आली.याच दरम्यान 2021 साली पीडीतेची आरोपी मनोज तुपे यांच्याशी बारामती येथे ओळख झाली. यावेळी “मी मोठा बिझनेस मॅन आहे तुला व तुझ्या मैत्रिणीला चांगला जॉब लावून देतो असं म्हणत पीढीतेचा मोबाईल नंबर घेतला.दोघांमध्ये सातत्याने फोनवर बोललं होत राहिलं.यानंतर मे 2021 साली पीडीता अभ्यासासाठी पुण्यात राहायला गेली.त्यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये आरोपी तुपे याने पीडितेला जेवणासाठी बोलावून हडपसरपर्यंत सोडतो असं म्हणत गाडीतळाच्या जवळ गाडीतच मनाविरुद्ध शारीरिक संबंध केले.यानंतर देखील अनेकदा आरोपीने पुण्यातील विविध हॉटेलमध्ये घेऊन जात लग्नाचे आमिष दाखवून पीडीतेवर बलात्कार केला.

सन ऑक्टोबर 2022 मध्ये पीडितेचे लग्न झाले मात्र ऑगस्ट 2023 पासून पीडीतेने नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.यावेळी पीडीता तणावात होती,यावेळी आरोपीने संपर्क करत “आपण लग्न करू,संपर्क तोडू नकोस”अस म्हणत पुन्हा पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवायला लागला.यानंतर मात्र जुलै 2025 आरोपी पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत होता.मात्र लग्नाचा विषय काढला की,चिढुन पीडितेसोबत भांडणे काढत काढायचा.यानंतर मात्र माझे समाजात नाव आहे मला तुझ्या सोबत लग्न करता येणार नाही,असे म्हणत आरोपीने लग्नाला नकार दिल्याने पीडितेने मी तुझी तक्रार करेल असं सांगितलं मात्र तुझे उघडे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले.अनेकदा आरोपीने शारीरिक संबध ठेवून प्रेग्नन्सी न राहण्याच्या गोळ्या खायला द्यायचा.असे फिर्यादीने फिर्यादीत म्हंटले आहे.

चौकट

अजून एका बारामतीतील एका युवा नेत्याची रिअल इस्टेट मधील कोटींची फसवणूक व प्रेम प्रकरण बाहेर येण्याची शक्यता आहे.?

आणि हा युवा नेता नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करत आहे.अशा कार्यकर्त्यांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाची बदनामी होत आहे का?

Back to top button