जनतेचा विश्वास, तरुणाईचा आवाज — सौरभ (भैय्या) शिंदे यांच्या नावाचे सोशल मीडियावर पोस्ट होतात वायरल
शांत, संयमी स्वभावाचा चेहरा म्हणून सौरभ लक्ष्मण शिंदे यांचे नाव चर्चेत

जनतेचा विश्वास, तरुणाईचा आवाज — सौरभ (भैय्या) शिंदे यांच्या नावाचे सोशल मीडियावर पोस्ट होतात वायरल
शांत, संयमी स्वभावाचा चेहरा म्हणून सौरभ लक्ष्मण शिंदे यांचे नाव चर्चेत
इंदापूर, –
इंदापूर शहरातील तरुण, संयमी आणि शांत स्वभावाचा चेहरा म्हणून सौरभ लक्ष्मण शिंदे यांचे नाव आज सर्वांच्या ओठांवर आहे. शिक्षण, संस्कार आणि समाजकारण यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, सौरभ शिंदे यांनी अल्पावधीतच कार्यकर्त्यांमध्ये एक आदर्श, निष्ठावंत आणि प्रामाणिक चेहरा म्हणून स्थान निर्माण केले आहे. गोरगरीब, सर्वसामान्य, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी काम करण्याची त्यांची तळमळ हेच त्यांच्या कार्याचे खरे बळ आहे.
महाविद्यालयीन काळापासूनच सौरभ शिंदे हे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय राहिले आहेत. कोरोनाकाळात त्यांनी निस्वार्थ भावनेने लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला. या काळात त्यांनी ड्रायफ्रूट वाटप, पोलीस आणि पत्रकार बांधवांना मास्क वितरण, तसेच स्वतःच्या मुलीच्या जन्माचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करून त्यांनी समाजात सकारात्मक संदेश दिला. मुस्लिम बांधवांसाठी शीरखुर्मा किटचे वाटप आणि इफ्तार पार्टीचे आयोजन करून धार्मिक सौहार्दाचे दर्शन घडवले. पत्रकार बांधवांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाची दखल घेतली. त्यांच्या सतर्कतेमुळे जलवाहिनी दुरुस्तीचे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकले, हीही एक लक्षणीय बाब आहे.
महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’, ‘गरबा-दांडिया’ सारखे कार्यक्रम स्वतः आयोजित करून त्यांनी महिलांना सन्मान आणि आनंद देणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. युवकांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन, विविध सण-उत्सवात सहभाग, दिवाळीच्या फराळापासून मिठाई वाटपापर्यंत त्यांनी सातत्याने समाजाशी जुळलेले नाते जपले आहे. विशेष म्हणजे, कोणतेही पद नसताना सुद्धा त्यांच्या प्रयत्नातून प्रभागात अनेक विकासकामे यशस्वीपणे पूर्ण होत आहेत हे त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाचे जिवंत उदाहरण आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात, तसेच तालुक्याचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ शिंदे यांनी पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य मनापासून केले आहे. पक्षवाढीसाठी, कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी आणि विकासाची दिशा देण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर विश्वास दृढ झाला आहे.

आज प्रभाग क्र. ३ मध्ये सौरभ शिंदे यांना नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या कार्याची साक्ष देतो. प्रामाणिकपणे काम करणारा, जनतेचा विश्वास जपणारा आणि शहराच्या विकासासाठी समर्पित असा तरुण चेहरा म्हणून ते उदयास आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि इंदापूर शहराचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, अशी सर्वसामान्य नागरिकांची खात्री आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीत तरुणाईचा आवाज, जनतेचा विश्वास आणि पक्षाचा अभिमान म्हणून सौरभ शिंदे यांचे नेतृत्व इंदापूरच्या नव्या वाटचालीसाठी नवी दिशा ठरू शकते.
 
					






