स्थानिक

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बारामती येथे ‘रन फॉर युनिटी’ कार्यकम संपन्न

पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे आयोजित कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बारामती येथे ‘रन फॉर युनिटी’ कार्यकम संपन्न

पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे आयोजित कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती वार्तापत्र 

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बारामती शहर व तालुका पोलीस स्टेशन यांचे संयुक्त विदयमाने राष्ट्रीय एकता दिवसाअंतर्गत ‘रन फॉर युनिटी’ उपक्रम तिरंगा सर्कल येथे आयोजित करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांनी हिरवा झेंडा दाखवून एकता दौडचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, एमआयडीसी बारामतीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय अधिकारी वैभव नायाडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, बऱ्हाणपूर पोलीस उप मुख्यालयाचे पोलीस उपअधीक्षक मधूकर भट्टे तालुका किडा अधिकारी महेश चावले आदी उपस्थित होते.

कार्यकमाची सुरूवात पोलीस वॅन्ड पथक पुणे ग्रामीण दलाच्या वाद्य वाजवून करण्यात आली. राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.
एकता दौडमध्ये सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

या कार्यकमात बारामती शहर व परिसरातील नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला तसेच शालेय विद्यार्थी, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण केंदातील विद्यार्थी व पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अमंलदार असे सुमारे बाराशेहून अधिक
नागरिकानी सहभाग घेतला.

Back to top button