कृषी

बारामती बाजार समिती मध्ये हमीभावाने सोयाबीन व उडीद खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

दि. १५ नोव्हेंबर २०२५ पासुन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पुढील ९० दिवसासाठी खरेदी करणेत येणार आहे.

बारामती बाजार समिती मध्ये हमीभावाने सोयाबीन व उडीद खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

दि. १५ नोव्हेंबर २०२५ पासुन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पुढील ९० दिवसासाठी खरेदी करणेत येणार आहे.

बारामती वार्तापत्र

खरीप हंगाम २०२५-२६ मधील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड मार्फत सोयाबीन, मुग व उडीद खरेदी करण्याकरिता ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू करणे करिता शासनाने कळविलेले आहे.

त्यानुसार दि. ३० ऑक्टोबर २०२५ पासुन ते ३१ डिंसेबर २०२५ या मुदतीत शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीने वाळलेला व स्वच्छ सर्वसाधारण दर्जाच्या शेतमालाची हमीदराने विक्रीची सोय व्हावी म्हणुन बाजार समितीने शासनाकडे मागणी केली होती. आधारभूत खरेदी केंद्रा करिता ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाले असल्याने दिलेल्या मुदतीत जास्तीत जास्त शेतक-यांनी खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले आहे.

सदर खरेदी केंद्रावर नाफेड मार्फत सोयाबीन प्रति क्विंटल रू. ५,३२८/- व उडीद रू. ७,८००/- आणि मुग रू. ८,७६८/- प्रति क्विंटल या आधारभूत दरानुसार हमीदराने शासन खरेदी करणार असल्याचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.
शेतक-यांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी करावयाची असल्याने नोंदणी करिता प्रचलित पद्धतीने शेतक-याचे आधारकार्ड, आधार लिंक मोबाईल नंबर, सन २०२५-२६ चा डिजीटल नोंद असलेला ७/१२ उतारा, पिकपेरा, बँकेचे पासबुक IFSC कोड सह ( आधार व मोबाईल नंबर लिंक असलेले ) झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.

शासनाने दिलेल्या मुदतीत दि. ३१ ऑक्टोबर २०२५ पासुन दि. ३१ डिंसेबर २०२५ पर्यन्त शेतक-यांनी बाबालाल काकडे निरा कॅनॉल सहकारी खरेदी विक्री संघ, तिरंगा सर्कल, बारामती (प्रशांत मदने) याठिकाणी ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. दि. १५ नोव्हेंबर २०२५ पासुन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पुढील ९० दिवसासाठी खरेदी करणेत येणार आहे. बारामती मुख्य बाजार आवारातील यांत्रिक चाळणी येथे ज्या शेतक-यांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे अशा शेतक-यांचे सोयाबीन, मुग व उडीद या शेतमालाची प्रत्यक्ष खरेदी दिलेल्या मुदतीत केली जाणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणताना शासनाचे निकषा प्रमाणे एफ.ए.क्यु. दर्जाचा व स्वच्छ आणि वाळवुन आणावा.

Back to top button