बारामती नगरपरिषदेच्या विद्युत विभागात भ्रष्टाचाराचा आरोप,विद्युत विभागाचे प्रमुख अधिकारी करतात तरी नक्की काय?
स्ट्रीट लाईट बंद करण्यासाठी कोणाला फोन करायचा

बारामती नगरपरिषदेच्या विद्युत विभागात भ्रष्टाचाराचा आरोप,विद्युत विभागाचे प्रमुख अधिकारी करतात तरी नक्की काय?
स्ट्रीट लाईट बंद करण्यासाठी कोणाला फोन करायचा
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषदेच्या हद्दीत कार्यरत असलेल्या विद्युत विभागात गंभीर भ्रष्टाचार सुरू असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत. नगर परिषदेकडून शहरातील काही भागांमध्ये नवीन विद्युत खांब उभारण्यात आले असले तरी,काही ठिकाणी या विद्युत खांबाच्या जागा जाणीवपूर्वक बदलल्या जात आहेत, असा आरोप आहे.
हे प्रमुख अधिकारी बाहेरगावचे असून रजेचा अर्ज न देता सुट्टीवर जातात.तसेच नगरसेवकांचे व पत्रकारांचे फोन उचलत नाही ठराविक जणांचे फोन उचलतात.त्यामुळे बारामतीतील दिवसभर सुरू असलेली स्ट्रीट लाईट बंद करण्यासाठी कोणाला फोन करायचा हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.हे प्रमुख अधिकारी कार्यालयीन वेळेत ही हजर न राहता इतरत्र फिरत असतात.अशा बेजबादार अधिकाऱ्याचा उपयोग तरी काय असा प्रश्न देखील नागरिकांना पडला आहे?
हा प्रमुख अधिकारी नागरिकांचे म्हणणे आहे की काही ठिकाणी अतिक्रमणास प्रोत्साहन देण्यासाठी आणि काही खासगी व्यक्तींना सोय करून देण्यासाठीच विद्युत पोल हलविण्याचे प्रकार केले जात आहेत.म्हणजेच, अतिक्रमणाला संरक्षण देण्यासाठी विद्युत विभागाचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
उपमुख्यमंत्रींच्या विधानाला विरोधाभास
राज्याचे उपमुख्यमंत्री बारामतीतील बेकायदेशीर कामे केली जाणार नाहीत,अशी भूमिका घेत असतानाच, त्यांच्या ताब्यात असलेल्या बारामती नगर परिषदेमध्येच बेकायदेशीर गोष्टींना परवानगी दिली जाते,असा आरोप विरोधकांनी केला आहे.यामुळे प्रशासनातील दुहेरी धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कार्यक्रमावेळी विद्युत उधळपट्टी
अलीकडेच बारामती नगर परिषदेत एक समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला सर्व कर्मचारीवर्गाने उपस्थिती लावली;मात्र,कार्यक्रम ऑफिसच्या कामाच्या वेळेतच पार पडला.त्यावेळी नगरपरिषदेतील कार्यालये पूर्णपणे बंद ठेवून,पंखे,लाईट आणि इतर विद्युत साधने चालू ठेवण्यात आली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज वाया गेली.नागरिकांनी या प्रकाराला वीज उधळपट्टी व गैरजबाबदारपणा असे म्हटले आहे.
मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी काय?
नागरिकांचा प्रश्न आहे की अशा बेफिकीर आणि भ्रष्टाचारमूलक कारभारावर मुख्याधिकारी कारवाई करणार का?शहरातील लोकांना जड जाणारा वीज खर्च आणि करांचा भार शेवटी नागरिकांच्या खिशातून जातो, मग अशा निष्काळजीपणाला जबाबदार कोण?
नागरिकांची मागणी
विद्युत विभागातील सर्व कामांची पारदर्शक चौकशी करावी.अतिक्रमणास प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.नगर परिषदेतील वीज वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पष्ट धोरण आखावे.विद्युत विभागाचे जे नगरपरिषदेचे अधिकारी आहेत ते नक्की करतात तरी काय हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.






