बारामतीत गुरुनानक जयंती उत्साहात साजरी
रात्री नऊ ते बारा या वेळेत गुरुनानक देवजींचा जन्म महोत्सव साजरा करण्यात येईल

बारामतीत गुरुनानक जयंती उत्साहात साजरी
रात्री नऊ ते बारा या वेळेत गुरुनानक देवजींचा जन्म महोत्सव साजरा करण्यात येईल
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी प्रभात फेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शहरातील विविध भागातून निघालेल्या प्रभात फेरीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.
यानंतर दुपारी निशान साहेब झेंड्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर नगर कीर्तन आणि लंगर प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुद्वाऱ्याच्या परिसरात सर्व भक्तांनी एकत्र येऊन गुरुनानक देवजींच्या शिकवणींचा स्मरण केला.
दुपारच्या सत्रात बारामती नगरीचे नगराध्यक्ष सदाशिव बापू सातव, माजी नगराध्यक्ष तसेच सुभाष शेठ सोमानी, श्रीकांत जाधव आणि अविनाश देवकाते यांचा गुरुद्वारात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पंजाबी सिंधी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण आहुजा, जगदीश पंजाबी, पवन आहुजा, मोहन भटियानी, संजय आहुजा, लक्ष्मीकांत रोहानी, सुमित खन्ना, अशोक पंजाबी, रमेश पंजाबी, जयेश आहूजा यांच्यासह पंजाबी सिंधी असोसिएशनचे सर्व समाजबांधव उत्साहाने सहभागी झाले.
सायंकाळी सात वाजता पुन्हा नगर कीर्तन आयोजित करण्यात येणार असून रात्री नऊ ते बारा या वेळेत गुरुनानक देवजींचा जन्म महोत्सव साजरा करण्यात येईल. गुरुद्वाऱ्याच्या परिसरात दिवसभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि आनंदी वातावरणात पार पडला.






