
सामाजिक बांधिलकी हेच माझे कर्तव्य..! – प्रा. डॉ. भिमराव मोरे
5555 रुपयाचा धनादेश
दौंड ;प्रतिनिधी
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दौंड रिक्षा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. भिमराव मोरे यांनी 5555 रुपयाचा धनादेश दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल यांच्याकडे सुपूर्द केला.
याप्रसंगी दौंड रिक्षा महासंघाचे सचिव उत्तम लोंढे, उपाध्यक्ष जावेद सय्यद, कोषाध्यक्ष बाबासाहेब कोरी, कार्याध्यक्ष राजेश बोर्डे, रितिक लोंढे, निलेश गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. मोरे यांनी “कर्तव्याची जाण हक्काचा अभिमान “या भावनेतून स्थापन केलेला दौंड रिक्षा महासंघ रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असून त्यांचे शासन दरबारातील अनेक प्रश्न सोडवित आहे.
रिक्षा चालकांना मानसन्मान, प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, त्यांच्या कौटुंबिक अडी अडचणी सोडवण्यासाठी दौंड रिक्षा महासंघ सतत कार्यशील असल्याचे श्री. मोरे यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकी हेच माझे कर्तव्य असल्याचे सांगून श्री. मोरे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी हा धनादेश दिला असल्याचे सांगितले.
दौंडच्या रिक्षा चालकांनी पूरग्रस्तांसाठी दिलेल्या धनादेशाचे कौतुक करून आमदार राहुलदादा कुल यांनी आभार मानले. तसेच बारामती, इंदापूर, दौंड ऑटो रिक्षा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत नाना सातव यांनी दौंड रिक्षा संघटनेने केलेल्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या.






