स्थानिक

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर त्वरित कार्यवाही करणार – चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन

उद्योजक व कंपनी प्रतिनिधींची बैठक

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर त्वरित कार्यवाही करणार – चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन

उद्योजक व कंपनी प्रतिनिधींची बैठक

बारामती वार्तापत्र 

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने अनेक महत्त्वाचे प्रस्ताव दिले असून त्यावर त्वरित कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. बारामती एमआयडीसीतील उद्योजक व कंपनी प्रतिनिधींची बैठक ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी उपस्थित राहून या बैठकीस मार्गदर्शन केले.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार , उपाध्यक्ष मनोहर गावडे, कार्यकारणी सदस्य हरिश्चंद्र खाडे, हरिष कुंभारकर,पियाजोचे चंद्रकांत काळे , डायनामिक्सचे मुकेश चव्हाण, एमआयडीसीचे उपअभियंता उपेंद्र गलांडे, रामचंद्र माने यांच्यासह उद्योजक व कंपनी प्रतिनिधी मोठ्या संख्येने यांनी या बैठकीत सहभागी होऊन चर्चेत सहभाग घेतला.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने दिलेल्या प्रस्तावांमध्ये एमआयडीसी मध्ये नवीन पार्किंग झोन तयार करणे, पेन्सिल चौकात सिग्नल यंत्रणा तातडीने सुरू करणे , एमआयडीसी मधील अंतर्गत रस्त्यांवर आवश्यक तेथे स्पीड ब्रेकर्स, रंबलर्स ,ब्लिंकर्स बसवणे, एमआयडीसी फेज टू व विमानतळाच्या परिसरात पोलीस चौकी उभारणे, चोऱ्यांना आळा घालणे, भंगारवाल्यांची अद्यावत नोंद ठेवणे, सीसीटीव्हीची व्याप्ती वाढवणे , कामगारांची पोलीस पडताळणी प्रभावीपणे करणे, महिला कामगारांच्या सुरक्षतेसाठी विशेष बंदोबस्त ठेवणे , जागोजागी सूचनापेटी बसवणे, बारामती एमआयडीसी क्षेत्रात पोलीस गस्त वाढवणे , पेन्सिल चौक ते गदिमा दुतर्फा रस्त्यावर दोन व चार चाकी वाहनांचे स्वतंत्र पार्किंग करणे, पोलीस ठाण्यात उद्योग संवाद कक्ष सुरू करणे अशा महत्त्वाच्या सूचना बैठकीत केल्या असल्याचे बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशन चे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी सांगितले.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने पोलिस विभागासंदर्भात उपस्थित केलेले मुद्दे एमआयडीसीसह इतर शासकीय विभागांशी देखील निगडित आहेत. या सर्व विभंगांशी समन्वय साधून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील
यांनी उपस्थित उद्योग प्रतिनिधींना दिली.

Back to top button