राजकीय

बारामती नगरपालिका निवडणूक — प्रतिष्ठेची लढत,पण जनतेची मागणी ‘चारित्र्यसंपन्न नगरसेवक देण्याची’

४० नगरसेवक

बारामती नगरपालिका निवडणूक — प्रतिष्ठेची लढत,पण जनतेची मागणी ‘चारित्र्यसंपन्न नगरसेवक देण्याची’

४० नगरसेवक

बारामती वार्तापत्र 

बारामतीचा लौकिक राज्यात विकासाच्या पॅटर्नसाठी आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वामुळे बारामतीला विशेष ओळख मिळाली. मात्र, पवार कुटुंबातील काका-पुतण्यामधील राजकीय दुरावा निर्माण झाल्यानंतर ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. त्यामुळे २०२५ ची बारामती नगरपरिषद निवडणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे.

बारामती नगरपरिषदेत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण वर्गासाठी राखीव असल्याने या वर्गातून अनेक इच्छुक उमेदवार समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही गटांकडून कोण नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देतील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अजित पवारांचा ‘होम पिच’वर तळ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे सध्या नगरपरिषदेची सत्ता आहे. येणाऱ्या निवडणुकीत सर्व ४० नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे “आपल्या विचारांचे” निवडून यावेत यासाठी ते स्वत बारामतीत तळ ठोकून प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.इतर अनेक माजी नगरसेवक सुद्धा नगराध्यक्ष या पदासाठी इच्छुक आहेत.

नगराध्यक्ष कसा असावा — बारामतीकरांची मागणी

जनतेच्या अपेक्षा केवळ राजकीय नव्हेत,तर नैतिकही आहेत. बारामतीकरांचा ठाम आग्रह असा आहे की, नगराध्यक्ष:पक्षनिष्ठ असावा सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध असावा,समाजात चांगला लौकिक असावा,प्रशासकीय अनुभव असावा,आर्थिक शिस्त आणि संघटन कौशल्य असावे,अधिकारी व कामगार यांच्यातील दुवा म्हणून कार्य करावा,नियमित अडचणी जाणून घेणारा असावा,सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वच्छ चारित्र्य असावास्वतः अजित पवार संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेणार असल्याने उत्सुकता अधिकच वाढली आहे.

निवडणुकीचा रणधुमाळी काळ

बारामती नगरपरिषद निवडणुकीचे मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.उरलेला कालावधी कमी असल्याने प्रचाराला जोर चढणार आहे.अजित पवार यांचा विकासदृष्टिकोन आणि बारामतीसाठी त्यांनी केलेले काम यावरच संपूर्ण प्रचार केंद्रित राहील.

जय पवार यांच्याविषयी चर्चा

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधून जय पवार यांनी ग्रामीण व शहरी जनतेशी जवळीक साधली आहे. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली तर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटबाजी कमी होईल आणि बारामतीच्या राजकारणात “वारसा हस्तांतरणाचा” प्रारंभ होईल, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे जय पवार हेही नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

जनतेचा इशारा — वादग्रस्त पदाधिकाऱ्यांना दूर ठेवा

स्थानिक नागरिकांची मागणी केली आहे की, गुन्हे दाखल असलेले, गैरव्यवहार,जमीन बळकावणे,अश्लील चॅटिंग,गुंडगिरी, ठेकेदारीत भ्रष्टाचार,अजित पवार यांचे नाव वापरून लोकांची फसवणूक करणारे पदाधिकारी अशा वादग्रस्त व्यक्तींना नगरसेवकपद न देता स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार द्यावेत.

Back to top button