माळेगाव बु

‘वंदे मातरम’ गीताचे बारामती तालुक्यातील माळेगाव बु. येथे सामूहिक गायन

34 शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी

‘वंदे मातरम’ गीताचे बारामती तालुक्यातील माळेगाव बु. येथे सामूहिक गायन

34 शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी

बारामती वार्तापत्र 

‘वंदे मातरम’ गीतास आज १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत तालुका क्रीडा संकुल माळेगाव बु. येथे ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.

यावेळी अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव बु. यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमास तहसीलदार गणेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी, प्राचार्य नितीन माने, प्रा. किशोर भोसले, बारामती औद्यागिक विकास संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, स्वयंसेवा संस्था प्रतिनिधी ओंकार तावरे, शिक्षक-कर्मचारी, विद्यार्थी उपस्थितीत होते.

यावेळी तालुक्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच 34 शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन केले. तसेच तसेच प्रा.अंबादास मेव्हणकर यांनी आपल्या व्याख्यानात ‘वंदे मातरम गीताचा इतिहास आणि स्वातंत्र्य संग्रामातील त्याचे महत्त्व’ या विषयावर माहिती दिली.
यावेळी ‘वंदे मातरम’ गायनासोबतच, विविध शाळेत सहभागी निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातून निवडलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

Back to top button