कविवर्य मोरोपंत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा : १४ नोव्हेंबर २०२५ व १५ नोव्हेंबर २०२५
५१ वर्षांपासून या स्पर्धा घेतल्या जातात.

कविवर्य मोरोपंत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा : १४ नोव्हेंबर २०२५ व १५ नोव्हेंबर २०२५
५१ वर्षांपासून या स्पर्धा घेतल्या जातात.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषद व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक १४ व १५ नोव्हेंबर २०२५ कविवर्य मोरोपंत वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात संपन्न होत आहेत.
दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी या स्पर्धेचे उद्घाटन मा.श्री.पंकज भुसे, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद यांच्या उपस्थितीत सकाळी ११.०० वा. होणार आहे. तर स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ५.०० वा. मा.डॉ.शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत होणार आहे.
गेल्या ५१ वर्षांपासून या स्पर्धा घेतल्या जातात. संपूर्ण महाराष्ट्रात ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जाते. यावर्षी देखील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय गटासाठी आकर्षक विषय निवडण्यात आलेले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयाकरिता वक्तृत्व स्पर्धा विषय – कनिष्ठ महाविद्यालय
१) योग, आहार आणि जीवनशैली
२) स्मार्टफोन : साधन की व्यसन?
३) अस्वस्थ वर्तमानात साहित्यिकांची भूमिका
४) संस्कृतप्रचूर मराठी काव्याचा झरा – कविवर्य मोरोपंत
५) भगवान महावीरांची शिकवण – आजच्या समाजासाठी दिशादर्शक
वक्तृत्व स्पर्धा विषय – वरिष्ठ महाविद्यालय
१) निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता
२) महासत्तांचे राजकीय अर्थकारण
३) कृत्रिम बुद्धिमत्ता – रोजगाराची बेरीज की वजाबाकी?
४) कृषिप्रधान भारतात रोजच शेतकऱ्यांचे मरण
५) कविवर्य मोरोपंतांचे काव्य – भक्तिरसाचे गंगास्नान
६) शाश्वत शांतीसाठी जैन तत्वज्ञानाचे योगदान
वरिष्ठ महाविद्यालय वादविवाद स्पर्धा – प्रस्ताव ‘व्यक्तिपूजा लोकशाही मूल्यांना मारक आहे असा प्रस्ताव आहे.
नेहमीप्रमाणे यावर्षी देखील जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तसेच श्रोत्यांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप व कार्याध्यक्ष प्रा.कृष्णा कुलकर्णी यांनी केले आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी स्पर्धेचे कार्याध्यक्ष मो.नं.८७८८९३३६३८ यांचेशी संपर्क साधावा.






