बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीला तयारीला लागलेली लाट, मागील सर्व रेकॉर्ड तोडण्याची शक्यता
अजित पवार गुरुवारी इच्छुकांच्या मुलाखती घेणार

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीला तयारीला लागलेली लाट, मागील सर्व रेकॉर्ड तोडण्याची शक्यता
अजित पवार गुरुवारी इच्छुकांच्या मुलाखती घेणार
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेची निवडणूक नऊ वर्षांच्या काळानंतर होत आहे आणि यामुळे उमेदवारांची संख्या या वेळी नवे उच्चांक गाठू शकते. नगरपालिकेच्या कारभारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व राहिले असून, त्यांच्या गटाकडून उमेदवारांची प्रचंड स्पर्धा दिसून येत आहे.
शरद पवार गट, भाजप आणि इतर पक्षही स्वबळावर उमेदवार रिंगणात उतरल्यास इच्छुकांची संख्या मागील सर्व रेकॉर्ड तोडू शकते.अजित पवार गटाकडे नगरसेवक पदासाठी सध्या 293 ते 300 अर्ज दाखल झाले आहेत,तर नगराध्यक्षा पदासाठी 18 ते 20 अर्ज आले आहेत.तर बारामती नगरपरिषदेकडे आज कोणतेही अर्ज दाखल झाले नाहीत.
अजित पवार गटात गटबाजी
अजित पवार यांच्या गटात सध्या अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. काही ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नव्या पिढीतील इच्छुकांमध्ये उमेदवारीवरून मतभेद असून, त्यामुळे अजित पवार यांना उमेदवारांची निवड करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. अनेक प्रभागांत एकाधिक दावेदार असल्यामुळे अंतिम उमेदवारांची निवड करताना काटेकोर निर्णय घेतला जाईल.
स्वच्छ उमेदवारांची मागणी
या निवडणुकीत नागरिकांचा मुख्य आवाज स्वच्छ, पारदर्शक आणि जनसंपर्क ठेवणाऱ्या उमेदवारांच्या बाजूने आहे. त्यांच्याशी संबंधित काही मुद्दे आहेत जसे की, उमेदवारांनी “दोन नंबरच्या व्यवहार” पासून दूर राहावे, ठेकेदारी व्यवसायात गुंतू नये, आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा.
आता अजित पवार गुरुवारी इच्छुकांच्या मुलाखती घेणार असून आता किती अर्ज दाखल होतात व किती जण मुलाखतीसाठी हजर राहतात हे पहावं लागणार आहे.






